SANGLI

Geography

पूर्वीच्या अखंड सातारा जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून १ ऑगस्ट १९४९ ला ‘दक्षिण सातारा’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला आणि पुढे त्यात नव्या तालुक्यांची भर घालून २१ नोव्हेंबर १९६०ला ‘सांगली जिल्हा’ हे नवं नामाभिधान करण्यात आलं. या जिल्ह्यात आता मिरज, कवठे महांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, पलुस, वाळवा, शिराळा, विटा-खानापूर आणि कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.

History

१८०१ काली चिंतामणरावांनी सांगली संस्थान स्थापन केलं तरी सुरुवातीची त्यांची काही वर्षे, धोंडजी वाघाबरोबरची आणि करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर मात्र लागलीच त्यांनी सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध `गणेशदुर्ग' बांधला. चारी बाजूंनी खंदक असलेला हा भुईकोट किल्ला म्हरजे सांगलीचे एक वैशिष्ट्य होतं ! ( याच गणेशदुर्गाच्या तुरुंगातून खंदकात उड्या टाकून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी ऐतिहासिक पलायन केलं होतं.) संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी देऊळ हवंच. पटवर्धन मंडळी परम गणेशभक्त. म्हणून १८११ साली चिंतामणरावांनी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं. त्याचं काम तब्बल तीस वर्ष चालू होतं.

Etymology

सांगली गावाच्या नावाविषयी अनेक समजुती आहेत. काहींच्या मते कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमाजवळ वसलेलं गाव म्हणून गावाचं नाव र्संगमहल्ली ( हल्ली म्हणजे कानडीत गांव. कर्नाटकचा मुलुख जवळ असल्यानं) होतं. काहींच्या मते मूळ नांव संगळकी असं होतं. पुढं नद्यांच्या संगमावरील म्हणून र्संगमी नाव पडलं आणि अपभ्रंश होऊन र्सांगली ' झालं. तथापि कृष्णा नदीकाठी सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे `सांगली' ही त्यातल्या त्यात सर्वमान्य असलेली समजूत.

SangliAtPresent

सांगली ही भारतात हळद व्यापार राजधानी आहे. साखर उद्योग लॉबी आहे. सांगली शहरात वसंतदादा साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. सांगली द्राक्षांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. सांगलीत अनेक औद्योगिक वसाहती आहेत. सांगली-मिरज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र या प्रदेशात सर्वात मोठे सुनियोजित औद्योगिक वसाहती आहेत . या औद्योगिक क्षेत्र इ ग्रीन हाऊस, हेल्थ क्लब, जलतरण तलाव, सॉफ्टवेअर प्रशिक्षण केंद्र, इत्यादी उपलब्ध नाही सांगली शिक्षण साठी की केंद्र आहे आणि काही फार चांगले इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत . सांगली प्रदेशात अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था तसेच अनेक सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आहेत. बरेच सांगली करण्यात येत आहे. अभियंते आणि दूरसंचार सॉफ्टवेअर व्यावसायिक, आधुनिक दूरसंचार व इंटरनेट सुविधा आणि मोबाइल सेवा एक भरपूर प्रमाणात असणे सांगली आता माहिती तंत्रज्ञान उद्योग हा एक आकर्षक स्थान आहे.

BAHE RAMLING

History

बहे येथील रामलिंग बेट वाळ्वे तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट नागरिकाचे श्रध्दास्थान व पर्यटनस्थळ म्हणून सांगली जिल्हयात प्रसिध्द आहे. इस्लामपुरापासून तेरा किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे.बेटावर चिंच, वड,पिंपळ,जाभूळ व इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलीनी परिसर सुशोभित आहे. लंकेहून परत येताना श्रीरमचंद्र कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी उतरले जवळच असलेल्या शिरटे गावात सीतामाई स्नानासाठी राहिल्या.श्रीरामांनी स्नान करून तेथे शिवलिंग स्थापले.शिवलिंगाची पूजा चालू असताना कृष्णेस उल्हास येऊन ती गर्जना करू लागली हनुमान जवळच उभे होते.महापुर येतोय असे पाहून त्यांनी नदीला आलेले पाणी दोन्ही बाहुनी थोपावले अशी आख्यायिका आहे. कृष्णा नदीला महापूर आल्याचार बेटाकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात. अंत्यत रमणीय परिसरामुळे नागरिकंना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे.यासाठी सहा कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यापैकी पहिला हप्ता म्हणून शासनाने दोन कोटी रुपये दिले आहेत. बेटवर येणार्याे पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता यावा, यासाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.अर्थमंत्री जयंत पाटील स्वत:या कामाकडे लक्ष देत आहेत.या बेटावर वर्षभर धार्मिक उत्सव सुरू असतात.पौष आमवस्येला मोठी यात्रा भरते .चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असे उत्सव साजरे केले जातात. वाळवे तालुक्याबरोबरच जिल्हा व शेजारच्या जिल्हातून या बेटाला भेटी देण्यासाठी नागरिकाची वर्दळ असते. एक दिवसाची छोटी सहल आयोजित करण्यासाठी हे ठिकाण रमणीय व निसर्गसौदर्याने संपन्न आहे.

CHANDOLI ABHYARANYA

History

चांदोली अभयारण्य सांगली,सातारा,कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौ. किलोमीटर परिसरात वसले आहे. राज्यातले निर्मनुष्य असणारे हे सर्वात मोठे अभयारण्य आहे.सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये असलेल्या आणि निसर्गाच्या विपूल संपत्तीने नटलेल्या चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. विविध प्रकारची झाडे,वृक्षवेली,औषधी वनस्पती,विविध प्राणी या सर्वामुळे चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांचे आकार्षण ठरत आहे. या अभयारण्यात सांबर,गवा,गेळा,अस्वल,भेकर,कोंळ्शिदा,तरस,साळिदंर,खवले मांजर,रानकुत्रा,कोल्हा.डुक्क्कर या विविध जातीचे सुमारे दीड हजार प्राणी तसेच रानकोबडे,मोर,गरूड.घार.घुबड असे विविध जातीचे पक्षी अढळून येतात. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ३० किलोमीटर जास्त अंतरापर्यंत पाण्यातून बोटीने प्रवास करता येतो. कलावंतीणीची विहीर, कंदहाराचा धबधबा, शिवशाही साक्ष देणारा इतिहासकालीन प्रचितगड, भैरवगड, वाल्मिकी मंदिर, झोळंबीचा सडा, रामनदी, प्राचीन मंदिरे हे सर्व पाहण्यासाठी अभयारण्याच्या वारणावती येथील कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. निसर्गाच्या विपूल संपत्तीने नटलेल्या या अभयारण्याचे सौंदर्य टिकवून ठेवणे व दुर्मिळ वनौषधी व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राच्या संघटनेच्या ’हेग’या आंतरराष्ट्रीय कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यास "चांदोली राष्ट्रीय उद्यान" देशातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावलौकीक मिळवेल.

KADEGAON

Geography

http://sangliinfo.com/admin/add_city.php

History

कडेगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. कडेगाव तालुक्यातील काही काही प्रमुख गावेः अंबक, अमरापूर, आपशिंगे, कडेपूर, कोथावडे, खबाळपाटी, चिंचणी, तडसर, तॉडोली, नेर्ली, वडगांव, वांगी, विहापूर, शामगांव, शाळगांव, शिवणी, शिवाजी नगर(न्हावी}, शेळकबाव, सोनकीर, सोनसळ, हिंगणगांव खुर्द, वगैरे. कडेगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या काही प्रमुख व्यक्ती : पतंगराव कदम, बापूसाहेब जाधव, मोहनराव कदम, लालासाहेब यादव वगैरे, कडेगाव तालुक्यातील काही प्रसिद्ध ठिकाणे : ङॉगराई देवी, सागरेश्वर घाट आणि अभयारण्य, सुर्ली घाट, कडेगांव(एम.आय.ङी.सी)., वांगी (कडेगाव)

आटपाडी

Geography

आटपाडी गाव उत्तर अक्षांश =१७.२५/पूर्व रेखांश= ७४.५७ वर वसलेले आहे. आटपाडीच्या पश्चिमेला पाझर तलाव आहे. येथून आटपाडीच्या पिण्याच्या व काही प्रमाणात शेतीच्या पाण्याची व्यवस्था होते. आटपाडी गाव व नवीन आटपाडीची वसाहत ही शुक्र नावाच्या ओढ्याने दक्षिणोत्तर विभागली गेली आहे.

History

१६व्या शतकात आटपाडी गाव हे आदिलशाहीचा भाग होते व नंतर पेशवाईच्या काळानंतर आटपाडी औंध संस्थानामधे महाल गाव होते. औंध संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणानंतर आटपाडी खानापूर तालुक्यातील एक गाव व नंतर सांगली जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव झाले आहे.

Etymology

आटपाडी तालुका पर्जन्यछायेमध्ये येणारा प्रदेश आहे. येथील मुख्य शेती ही ज्वारी, मका, गहू, काही प्रमाणात ऊस व कापूस आणि डाळिंब यांची होते. डाळिंबामुळे आटपाडीच्या शेती उत्पादनात आमूलाग्र बदल झाला आहे.

SangliAtPresent

शासन व्यवस्था आटपाडीची शासन व्यवस्था ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत चालते. आटपाडीमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि पोलिस ठाणे आहे. शिक्षण व्यवस्था आटपाडीमधे कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, अध्यापन इत्यादी शाखांची महाविद्यालये आहेत. शिक्षण व्यवस्था ही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय इत्यादी पातळीपर्यन्त उपलब्ध आहे. प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा • श्री भवानी विद्यालय हायस्कूल • श्री राजाराम बापू पाटील हायस्कूल • श्री व.दे.दे. गर्ल्स हायस्कूल उच्च माध्यमिक • श्री भवानी विद्यालय ज्युनियर सायन्स कॉलेज महाविद्यालय • आटपाडी कॉलेज, आटपाडी • कला विज्ञान महाविद्यालय • श्रीराम सोसायटीचे अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय • अध्यापक विद्यालय • शेती पदविका विद्यालय उद्योग व्यवसाय माणगंगा सहकारी साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी, डाळिंब प्रक्रिया व पॅकेजिंग प्रकल्प हे येथील प्रमुख उद्योग आहेत. कला आणि संस्कृती व मनोरंजन आटपाडीचे नाव कलेच्या क्षेत्रात वाखाणण्यासारखे आहे ते आटपाडी मध्ये जन्मलेल्या या ४ साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांमुळे १) ग. दि. माडगुळकर, २)व्यंकटेश माडगुळकर, ३) शंकरराव खरात, ४) ना. सं. इनामदार. याच बरोबर धनगरी नृत्य आटपाडीच्या संस्कृतीचा मुख्य घटक आहे. कोल्हापुरी फेटा हा मूळचा माणदेशातील लहरी पटका/फ़ेटा आहे. मंदिरे आणि उत्सव आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर आहे व आटपाडीची जत्रा उत्तरेश्वराच्या नावाने होते. जत्रा तीन दिवस चालते व याप्रसंगी गावातून उत्तरेश्वराचा रथ ओढण्याची प्रथा आहे.

जत

Geography

जत तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे.

History

जताचे सर्वांत पुरातन उल्लेख रामायणकाळातील असल्याचे मानले जाते - हा प्रदेश दंडकारण्यातलेजयंतीनगर होते असे सांगितले जाते[ संदर्भ हवा ]. इ.स.च्या ११ व्या व १२ व्या शतकातील काही शिलालेख जत तालुक्यातल्या उमराणी, कोळेगिरी येथील पुरातन मंदिरांत आढळून येतात. कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दाने दिल्याचे उल्लेख त्यांत आढळतात.

Etymology

जत येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती.

SangliAtPresent

येथील यल्लम्मा (रेणुका) देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. जत पासून १५ किलोमीटर अंतरावर बनाळी गावात बनशंकरी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे . तसेच गुड्डापूर ची धान्नमा देवी हे कर्णाटक व महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचे मोठे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे . बिळूरचा भैरवनाथ प्रसिद्ध आहे

कवठेमहांकाळ

Geography

पलुस

शिराळा

Geography

शिराळा गाव स्थान शिराळा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (नवीन नंबर ४८)वरील वाघवाडी, इटकरे फाटा व पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबईपासून ३५० किलोमीटरवर, सांगलीपासून ६० किलोमीटरवर आणि कोल्हापूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिक शिराळा हे डोंगराळ भागात असून गावाची रचनाही चढ‍-उतारावरती आहे. या गावाचे मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे हवामान आहे. गावाला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणार्याा मोरणा नदीचासंगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झालेला आहे.

History

ऐतिहासिक शिराळा या गावाला फार मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथे असणारा भुईकोट किल्ला. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनीस्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोराक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच 'बत्तीस शिराळा'... छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले. शिराळ्यामध्ये वर्षाकाठी महत्त्वाच्या २ यात्रा भरतात, एक नागपंचमीची आणि दुसरी गोरक्षनाथांची. तसेच १२ वर्षातून एकदा महायात्रा भरते. उत्तरेतून कुंभ मेळ्यातील सगळे साधू नाथांच्या दर्शनाला येतात तेव्हा ही खूप मोठी यात्रा भरते. शिवाय प्रत्येक एकादशीला एक छोटी यात्रा भरते.

Etymology

शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते.

SangliAtPresent

धार्मिक वैशिष्ट्य हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकर्यांतच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे२ जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मंदिरे • गणपती मंदिर • गुरुदेव दत्त मंदिर • गोरक्षनाथ मंदिर • ग्रामदैवत अंबामाता मंदिर • नृसिंह मंदिर • महादेव मंदिर • मारुती मंदिर (समर्थ रामदास स्थापित) • राम मंदिर • लक्ष्मी नारायण मंदिर • विठ्ठल रुक्मिणी मंदिर • शनिदेव मंदिर गावातील MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रियल ॲन्ड डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन)मध्ये छोटेछोटे औद्योगिक कारखाने आहेत.. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत. 'विराज अल्कोहोल' ही येथील एक मोठी कंपनी असून इथेही बर्यायच लोकांना रोजगार मिळाला आहे.

तासगांव

SangliAtPresent

तासगाव ही बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचे गोपूर उंची ९६ फूट आहे. येथील रथोत्सवाच्या दिवशी लाखो भाविक तीन मजली रथास दोरखंडाद्वारे ओढून पटवर्धन राजाच्या राजवाड्यातील गणपतीचे विसर्जन करतात. हा गणपती दीड दिवसांचा असतो. हा रथोत्सव १५० वर्षांपासून चालत आला आहे.[ संदर्भ हवा ] हा गणपती उजव्या सोंडेचा आहे.

वाळवा

Geography

वाळवा गाव स्थान : वाळवा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाघवाडी, इटकरे फाटा व पेठ नाक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई पासून ३४७ किलोमीटरवर, सांगली पासून ३३ किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून कृष्णा नदी वाहते. शेती वाळवा येथील पिकाऊ जमीन अंदाजे २१ हजार एकर आहे. जमीन काळीभोर,कसदार असून प्रथम पासून या परिसरातील कष्टाळू शेतकरी विविध प्रकारची शेती उत्पन घेत आहेत.

History

इतिहास कर्मवीर भाऊराव पाटलांची पाऊले इथे उमटली .१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात आख्खे वाळवा गाव उतरत असे ब्रिटिशांच्या ११३ देशातील अवाढव्य साम्राज्यामध्येही स्वातंत्राची बेटे असणारया मोजक्या गावात वाळव्याचा उल्लेख गौरवाने करावा लागेल .या काळात अगदी स्त्रियादेखील प्रभात्फेरीमध्ये स्वातंत्र्याची गाणी गात कमालीच्या निर्भयपणे सामील होत असत.साचा:क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ग्रंथ क्रांतिसिंह नाना पाटील जीवनाच्या अंतिम क्षणात वाळव्यामध्ये राहीले.वाळवा त्यांची कर्मभूमी होती.क्रांतिवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी हे युगपुरुष वाळव्याचेच.नागनाथअण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या करिता झटत राहीले.त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ज्या भारताची स्वप्ने पाहिली होती, ती सगळीच साकार झालेली नाहीत. परंतु स्वातंत्र्यानंतर हा देश घडावा म्हणून त्यांनी जे कष्ट घेतले, जी चळवळ उभारली त्यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बालवाडी सुरू केली. त्यातूनच शाळा, मग महाविद्यालय सुरू केले. प्रगतीच्या या प्रक्रियेत शेतकऱ्यांनाही सहभागी करून घेता यावे म्हणून त्यांनी हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना सुरू केला. सहकारक्षेत्रातला तो एक क्रांतिकारी प्रयोग ठरला. सामाजिक विचारांनी प्रेरित व्यक्ती अनेकदा व्यवसायात अपयशी ठरतात किंवा टोकाची भूमिका घेऊन वागतात. अण्णांनी त्यावर मात केली. कारखाना उत्तम चालवून दाखवला आणि तरीही स्वत:चे रूपांतर कारखानदारात होऊ दिले नाही. स्वत:मधील सामाजिक आंदोलक त्यांनी सुस्तावू दिला नाही

Etymology

वाळव्यातले प्रमुख भाग १) हाळभाग २) कोठभाग ३) पेठभाग ४) माळभाग ५) चांदोली वसाहत ६) लक्ष्मी नगर ७) गणेश नगर ८) मोहिते मळा ९) क्रांतिवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी श्रमिक नगर १०) माळी मळा, ११) आचरे मळा

SangliAtPresent

मंदिरे वाळवा गावात रेणुकामाता मंदिर,गणपती मंदिर,गुरुदेव दत्त मंदिर,अंबामाता मंदिर,महादेव मंदिर,मारुती मंदिर,लक्ष्मी मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,बिरोबा मंदिर अशी मंदीरे आहेत. औद्योगिक वाळवा येते पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. वाळवा येतील सहकारी क्षेत्रातील कारखान्यामुळे शेतकरयाची शेती बागायती झाली आणि अनेक छोटे मोठे उद्योग निर्माण झाले. सर्वसामान्याची क्रयशक्ती वाढली. केवळ ऊस बागायती शेतीवर अवलंबून न राहता द्राक्षे आणि गुलाबाच्या फुलांची निर्यात परदेशातही परदेशातही होवू लागली. ठिबकसिंचन,स्प्रिंकलर इ.साधनाचा करून साधनांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे उत्पन वाढवले.आजचा आधुनिक शेतकरी अधिक उत्पनासाठी आधुनिक शेतीकडे वळला आहे.विविध प्रकारच्या जलसिंचन योजना राबवल्या मुळे वाळवा परिसरातील बहुतेक क्षेत्र ओलिताखाली आली आहे. वाळव्यामध्ये विविध बँका आणि पतसंस्थाचे जाळे असल्यामुळे शेतीसाठी आणि शेती पूरक उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्यास अडचण नाही. औद्योगिक शैक्षणिक आणि वित्तीय संस्था : १) पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि.नागनाथअण्णा नगर २) हुतात्मा सहकारी दुध संघ वाळवा ३) हुतात्मा बझार ४) हुतात्मा सहकारी बँक ५) सहवीज निर्मिती प्रकल्प ६) इथेनॉल प्रकल्प ७) किसान शिक्षण संस्था ८) जिजामाता विद्यालय ९) सावित्रीबाई फुले वसतीगृह १०) किसना नं. १ पाणी संस्था ११) हुतात्मा किसन अहिर विद्यालय १२) क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय १३) राजाराम विद्यालय १४) विविध इरिगेशन संस्था १५) विविध विक्री संस्था १६) हुतात्मा प्राथमिक विद्यालय १७) हुतात्मा नानकसिंग वसतीगृह १८) बँक ऑफ बडोदा १९) अपना बँक २०) राजारामबापू सहकारी बँक २१) सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक

मिरज

Geography

मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.मिरजेचा इतिहास गेल्या हजा‍र वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते. मिरज हे एक महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे. शहरात वानलेस मेमोरियल रूग्णालय, वानलेस उरोरूग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रूग्णालय आणि इतर अनेक रूग्णालये आहेत. शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रूग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारांसाठी मिरजेला येतात. मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..

History

इतिहास मिरज सिनीयर संस्थान दि 08 मार्च 1948 रोजी भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्याचे एक शहर आहे. १. सिलाहर राजवंशात नार्सिम्हा च्या नियत्रणाखाली १०२४ई मिरज २. १२१६-१३१६ ई मिरज देवगिरी च्या यादवच्या द्वारे शासित होता. ३. १३९५ ई मिरज बहामणी च्याद्वारे विजय प्राप्त झाले. ४. १३९१-१४०३ दुर्गा देवीचा काळ. ५. मलिक इमाद उल मुल्क के तहत १४२३ ई मिरज. ६. १४९४ ई. बहादूर गिलानी विद्रोह. ७. १६६०ई छत्रपती शिवाजी महाराज दोन महिने वास्तव्य होते. ८. १६८० ई संताजी घोरपडे मिरज चे देशमुख होते. ९. १६८६ ई. मिरज औरंगजेबाच्या हातात गेले. १०.१७३० ई. पंत प्रतिनिधी च्या हस्ते छत्रपती च्या राज्यात.

Etymology

प्रमुख भाग • ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पुर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या , विकासाच्या, जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.

SangliAtPresent

उपनगरे • चंदनवाडी,टिळकनगर • सुभाषनगर(MRJ) • कृपामयी • गगनगिरीनगर • खोतनगर • दत्तकॉलनी,इंदिरानगर • भारतनगर • माणिकनगर • वान्लेसवाडी • बेथलनगर • वड्डी • समतानगर जैवविविधता अर्थकारण बाजारपेठ • लक्ष्मी मार्केट - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने हॉटेल्स त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केट ची इमारत अतिशय भव्य व ब्रिटीशकालीन आहे. प्रशासन नागरी प्रशासन शहरातील प्रशासन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालीकेमार्फत होते. जिल्हा प्रशासन सांगली जिल्हापरीषद वाहतुक व्यवस्था रेल्वे वाहतुक मिरज मध्य रेलवे एक महत्वपूर्ण जंक्शन आहे. ब्रॉड गेज, छोटी लाइन और मीटर गेज - ह्या तीन रेल गेजचा संगम होता . शेवटी छोटी लाइन गाड़ी 1 नोव्हेबर 2008 ला स्वर्गवासी. मिरजला आता फक्त ब्रॉड गेज रेलवे पटरि आहेत । ही रेल्वे पुणेला जोडली आहे. उत्तर खुर्दुवाडी la पंढरपुर कडून दक्षिणेला लोंडा जंक्शनला उत्तर. उत्तर पूर्व आणि हुबली व गोवा जोडली. कोल्हापुरपासून सोलापुरपर्यंत पैसेंजर ट्रेन परिवर्तित मिरज-पंढरपुर-कुर्डूवाडी फेब्रुवारी 2011 में ब्रॉड गेज ट्रैक वर चालू लागली. मिरज जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्वाचे दळण वळणाचे साधन आहे. रस्ते वाहतुक लोकजीवन येथील लोक मराठी भाषक आहेत. येथील लोक वाद्यांचा व्यवसाय करतात. संस्कृती रंगभूमी मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे . मिरजेतील लक्ष्मी मार्केट पासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर दिसेल . पं.. पलुसकर विष्णु, उस्ताद अब्दुल करीम खान, पंडित निकालके. भातखंडे, हिराभाई बडोदेकर और पं.. पटवर्धन विनायकराव मिरज चे प्रसिद्ध कलाकार आहेत. बाल गंधर्व हन्सप्रभा रंगमंच वर मिरज मध्ये आपली पहिली फिल्म चे प्रदर्शन केले गेले। एकच स्थान वर नवनिर्मित बालगंधर्व नाट्यगृह त्याच्या नावावर बाधले गेले. उस्ताद अब्दुल करीम खान, किराना घराने के अगुआ, झूठ ख्वाजा शम्शुधीन मीरा साहेब दरगाह आणि वार्षिक संगीत उत्सव चे योग दरगाह वर त्यांच्या स्मृति साठी आयोजित केले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत चा या समृद्ध परंपरे मुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे. चित्रपट मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात वेगवेगळे चित्रपटगृह आहेत. या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे. एस.टी.स्टड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्द चित्रपट गृह आहे. लक्ष्मि मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह. शिवाजी रोड चे शिवशंकर सिनेमागृह. एम.जी.रोड चे आशा सिनेमागृह. तसेच माधव व मंगल टोकीज. प्रसिध्द आहेत. अलीकडे काही चित्रपटाचे चित्रीकरण ही होऊ लागले आहे. धर्म- अध्यात्म खवय्येगिरी मिरजेची खवय्ये खुप स्पेशल आहेत . मिरज मधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड , सांगली-मिरज रोड या ठिकाणी खवय्ये आहेत . मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई हे चौगुले कुठुबियांचे पेढे व मिठाई साठी प्रसिद्ध् आहे शिवाजी रोड वरील हॉटेलस आणि पंढरपुर रोड चे ढाबे मिरज साठी वैशिष्ट पूर्ण आहेत. मिरजेतील काही नामाकीत हॉटेल्स अक्षय हॉटेल साई व्हिजन रह्म्द्तुल्लाह हॉटेल अप्सरा हॉटेल न्यू पूर्वा हॉटेल अन्नपूर्णा मिरची हॉटेल माझा बंडू

विटा

आष्टा

इस्लामपूर